Pune Crime News | पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना 25 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुंतवणुकीच्या मोबदल्यात जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने (Lure Of Good Returns) गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील एका व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फसवणुकीचा गन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी 2023 ते मे 2024 या कालावधीत बाणेर भागातील अमर नेपच्युन च्या (Amar Neptune Baner) ऑफिसमध्ये घडला आहे.

याबाबत शरद नारायण पाठक (वय-79 रा. कोथरुड, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन समीर गुलाबराव थिटे Sameer Gulabrao Thite (वय-42 रा. राज लिगसी, ए बी एस रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. समीर थिटे याने पुण्यासह मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्यावर ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात (Shrinagar Police Station Thane) आयपीसी 420, 409, 120(ब) सह एम.पी.आय.डी गुन्ह्यांतर्गत (MPID Act) गुन्हा दाखल असून आरोपी सध्या कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर थिटे याने कंपनी स्थापन केली होती.
त्याच्या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा मोठा परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते.
त्यामुळे फिर्यादी यांच्यासह इतरांनी त्याच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती.
त्यासाठी समीर थिटे हा गुंतवणूकदारांसोबत करारपत्र तयार करत होता.
सुरुवातीचे काही महिने त्याने गुंतवणूकदारांना परतावा दिला होता.
मात्र त्यानंतर समीर थिटे याने गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केले होते.
त्यामुळे फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी त्यांची मूळ रक्कम मागितली.
परंतु ही रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! पात्र मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे- दीपक सिंगला