Pune Crime News | पुणे : पोलीस दारात दिसताच ड्रग्ज पेडलरचा हार्ट अटॅकने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात (Pune Drug Case) मोठी कारवाई करुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केला आहे. त्यानंतर पोलिसांनी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना आणि वितरणाचे जाळे उधवस्त केले. यानंतर पुणे पोलिसांनी ड्रग्ज पेडलरकडे आपला मोर्चा वळवला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच एका 52 वर्षीय माफियाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.(Pune Crime News)

मृत माफिया पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याच्यावर यापूर्वी ड्रग्ज विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केले जात होते. त्यावेळी माफिया त्याच्या नाना पेठेतील घरी आल्याची माहिती
पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक माफियाच्या घरी गेले. पोलिसांनी दरवाजा वाजवला.
माफियाने दरवाजा उघडला असता त्याला समोर पोलीस दिसले. पोलिसांना पाहताच तो खाली कोसळला.

पोलिसांनी आणि त्याच्या घरच्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांनी त्याला तपासून हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे घोषित केले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली.
झडतीमध्ये त्याच्या घरात काही ग्रॅम ड्रग्ज सापडले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | पुणेकर आता फसणार नाहीत तर जिंकणार आहेत; काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भावना, उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव (Video)

MPSC Exam Postponed | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल व 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

Pune Police News | पुणे: खाजगी वाहनाला पोलीस वाहनासारखी रंगरंगोटी करुन शासकीय कामासाठी वापर केला जात असल्याचा आरोप, माहिती अधिकारात पोलिसांचा ‘प्रताप’ उघड; संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

Pimpri Murder Case | पिंपरी : मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करुन खून