Pune Police News | पुणे: खाजगी वाहनाला पोलीस वाहनासारखी रंगरंगोटी करुन शासकीय कामासाठी वापर केला जात असल्याचा आरोप, माहिती अधिकारात पोलिसांचा ‘प्रताप’ उघड; संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Police News | राज्य सरकारने पोलीस दलाला शासकीय कामकाजासाठी वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र, पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) भलताच प्रकार समोर आला आहे. खासगी वाहनास राज्य शासनाने पोलिसांसाठी पुरवलेल्या वाहनासारखी हुबेहूब रंगरंगोटी करुन त्या वाहनाचा वापर शासकीय कामकाजासाठी करण्यात येत असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. याबाबत अमोल बाबूराव निकाळजे यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागवली आहे.(Pune Police News)

पोलिसांची दळवळणाची गरज पुरविण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या वाहनांचा वापर टाळून चंदननगर पोलीस स्टेशनचे अधिकारी या खाजगी वाहनाचा वापर करत आहेत. खासगी वाहनास हुबेहुब राज्य शासनाने पोलिसांसाठी पुरवलेल्या वाहनासारखी हुबेहूब रंगरंगोटी करुन त्या वाहनाचा वापर शासकीय कामकाजासाठी करण्यात येत आहे.

खासगी वाहन (MH 12 एनयू 8642) चंदननगर पोलीस ठाण्याच्या आवारात उभे असते. या वाहनाचा उपयोग शासकीय कामकाजासाठी, आरोपींची ने-आण करण्यासाठी होतो. वाहनाची मालकी ही राज्य शासनाची नसून चंद्रकांत बळीराम भोसले या व्यक्तीची असल्याचे अमोल बाबूराव निकाळजे यांनी म्हटले आहे.

तसेच राज्य शासनाने पुरवलेल्या वाहनांच्या क्रमांकाचे हे वाहन नाही. या क्रमांकाची नोंद शासनाने पुरविलेल्या वाहनांच्या क्रमांकात कोठेही नाही.
पोलीस दलाकडे पुरेशा वाहनांची उपलब्धता असताना खाजगी वाहन हे पोलिसांचे वाहन असल्याचे भासवून त्याचा
शासकिय कामकाजात वापर करण्याचे प्रयोजन काय? तसेच या वाहनाचा खर्च व इंधन हे शासकिय तिजोरीतून जाते का
याची चौकशी करावी अशी मागणी निकाळजे यांनी केली आहे.

या प्रकरणाची उच्च स्तरावरील सक्षम अधिकाऱ्याकडून चौकशी करावी.
तसेच संबंधित अधिकाऱ्यावरील आरोप चौकशीत स्पष्ट झाले तर त्यांची प्राथमिक चौकशी करुन त्यांच्यावर महाराष्ट्र
नागरी सेवा (शिस्त आणि अपिल) नियम 1979 (वर्तणूक) मधील प्रकरणी संबंधित व लागू असणाऱ्या सेवानियमांतील
कलमे यांच्या आधारे निलंबनाची प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निकाळजे यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MPSC Exam Postponed | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल व 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली