Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन देहुरोड पोलिसांनी (Dehu Road Police) कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करुन जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी (Extortion Case) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा ते 11 फेब्रुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान सिम्बायोसिस कॉलेज जवळील सेवन कॅफे, मायाज लॉज येथे तसेच गहुंजे स्टेयीयम येथे घडला आहे. (Pune Crime News)

अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहुरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर आयपीसी 363, 384, 385, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वैभवसिंग मनिषकुमार सिंग चौहाण (वय-19 रा. बॉईज हॉस्टेल सिम्बायोसिस कॉलेज किवळे) याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी चौहान हा तरुण किवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज कॉलेजमध्ये शिकतो.
तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो. देहुरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदार आणि इतर आरोपींनी संगनमत
करुन चौहान याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कॉलेज जवळील सेवन कॅफे मधून अपहरण केले.

तेथून चौहान याला मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तिथून देहुरोड पोलीस ठाण्यात आणले.
चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी दिली.
कारवाई टाळायची असेल तर 20 लाख रुपयांची मागणी केली.
पोलिसांसह इतर आरोपींनी धमकी दिल्याने घाबरलेल्या चौहान याने त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यावर
गुगल पे व नेट बँकींगद्वारे 4 लाख 98 रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले.
पुढील तपास देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | चोरी करुन वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या दाम्पत्याला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये चोरी करणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांकडून अटक, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजाची तस्करी करणाऱ्या सिव्हील इंजिनिअरसह तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 27 किलो गांजा जप्त

पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला अश्लील मेसेज करुन धमकी, दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल