Pune Crime News | पुणे : पत्नीसोबत असलेल्या वादातून पतीने पेटवली सासूची दुचाकी, परिसरात पार्क केलेल्या 14 दुचाकी जळाल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीसोबत असलेल्या वादाचा राग जावयाने सासूच्या दुचाकीवर काढला. जावयाने सासूची दुचाकी पेटवून दिल्याने त्याठिकाणी पार्क केलेल्या 14 दुचाकी जळाल्याने दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार बुधवारी (दि.1) वडगाव बु. (Vadgaon Budruk) येथील कार्पोरेशन बिल्डींगच्या (Corporation Building) पार्किंगमध्ये दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 42 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गणेश दिनकर दहिभाते (वय-35 रा. विठ्ठल मंदिराजवळ, उत्तमनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 435 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि त्याच्या पत्नीसोबत वाद आहेत. याच वादाच्या रागातून आरोपी बुधवारी दुपारी सासुरवाडीत आला. गणेश दहिभाते याने बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली फिर्य़ादी यांची ज्युपिटर गाडी पेटवून दिली. यामुळे दुचाकी शेजारी पार्क केलेल्या इतर 14 दुचाकींनी पेट घेतला. यात फिर्य़ादी व इतर 14 अशा एकूण 15 दुचाकी जळून नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालुसरे करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक गुन्हे राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभायस,
पोलीस उपनिरीक्षक मालुसरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lonikand Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईसह तिघांवर गुन्हा

Attack On Journalist In Pimpri | पिंपरी : तहसिलदाराकडे तक्रार केल्याच्या रागातून पत्रकाराला मारहाण

Sambhajiraje Chhatrapati On BJP | 272 म्हणायला अवघड होतं मग 300 म्हणा, पण 400 पार म्हणजे…, संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका!