Sambhajiraje Chhatrapati On BJP | 272 म्हणायला अवघड होतं मग 300 म्हणा, पण 400 पार म्हणजे…, संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका!

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Sambhajiraje Chhatrapati On BJP | तुम्ही कधी विचार केलाय की चारशे पार म्हणजे काय? चारशे पार ही धोक्याची घंटा आहे. ते २७२ का म्हणत नाहीत? ५४३ खासदारांमध्ये निम्मे करा ना तुम्ही? म्हणजे २७२ होतात. ठीक आहे २७२ म्हणायला अवघड होते मग ३०० म्हणा. पण ४०० का? ४०० पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचे आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही तर कायदा बदलायचा आहे, असा आरोप युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपावर केला.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे (Congress Candidate) कोल्हापूरचे (Kolhapur Lok Sabha) उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेमध्ये छत्रपती संभाजीराजे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या चार सौ पार घोषणेवर जोरदार टीका केली.

छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, तुम्ही कधी विचार केला आहे का, की चारशे पार म्हणजे काय? चारशे पार ही धोक्याची घंटा आहे. त्यांना संविधान बदलायचे आहे.

दरम्यान, ४०० पारची घोषणा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपासाठी मोठी अडचण झाली आहे. संविधान बदलण्यासाठी ४०० पारची घोषणा केली आहे, आरोप चोहोबाजूंनी भाजपावर होत आहे. त्यातच भाजपाच्या काही खासदारांनी यापूर्वी संविधान बदलण्याचे केलेले वक्तव्य देखील भाजपाला अडचणीचे ठरत आहे. यामुळे आता भाजपाचे वरिष्ठ नेतेच आपल्या भाषणात ४०० पारचा नारा टाळत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

४०० पारच्या घोषणेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता
आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ती संपविण्याची योजना आखली आहे.
दरम्यान, अशाप्रकारचे आरोप सातत्याने होत असल्याने ते खोडून काढताना मोदी आणि भाजपाची दमछाक होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Election Commission Of India | मतदानाची टक्केवारी अचानक वाढवली? देशातील हा प्रकार धक्कादाय, संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Sharad Pawar On PM Narendra Modi | शरद पवारांनी केली मोदींची नक्कल, म्हणाले, ”जातील तिथं मोदी स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली…”