Pune Crime News | पुणे-फातिमानगर क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – मसाज पार्लरच्या नावाखाली भलताच उद्योग, 5 महिलांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा (SS Cell Pune) विभागाने फातिमानगर परिसरातील क्लीओज स्पा अ‍ॅन्ड सलूनवर छापा टाकून सुरू असणार्‍या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश (Prostitution Racket) केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. मसाज पार्लर चालकास अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

श्रीधर मोहन साळुंखे (42, रा. पवळे चौक, कबस पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक महिती अशी की, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फातिमानगर परिसरातील क्लीओज स्पा अ‍ॅन्ड सलूनमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Crime News)

पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास मसाज पार्लरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे 5 महिला आढळून आल्या.
पोलिसांनी त्यांची सुटका केली तर महिलांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांना भलताच उद्योग करण्यास
प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लर चालक श्रीधर मोहन सोळुंखे याच्याविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिला पोलिस नाईक रेश्याम गणपत कंक यांनी
फिर्याद दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे
(Sr PI Bhausaheb Pathare) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune-Fatimanagar Crime News : Wanwadi Police Station – Business under the guise of massage parlour, Pune Police Crime Branch SS Cell Arrested Shridhar Mohan Salunkhe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

Namo Awas Yojana | ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल