NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Former Governor of Jammu and Kashmir Satya Pal Malik) यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरुन (Pulwama Attack) केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर (Modi Government) आरोप केले होते. या आरोपानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी यासंदर्भात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

काश्मीरमधील पुलवामा येथे 40 जवानांची हत्या झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपच्या (BJP) विचाराचे होते. भाजपनेच त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. आता राज्यपाल पदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट (Aircraft) आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या विषयावर शांत राहायला सांगितल्याचंही ते म्हणाले, ही सत्य परिस्थिती होती, असे शरद पवार  यांनी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले, आपल्या सैनिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजप सरकारवर होती.
परंतु सरकारने ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही,
अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले सत्यपाल मलिक?

पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं (CRPF) एअरक्राफ्टची मागणी केली होती.
केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) नकार दिला.
त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं
मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP Chief sharad pawar criticized pm narendra modi after satyapal malik allegation on pulwama attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

Namo Awas Yojana | ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार