Pune Crime News | पुणे : पार्क केलेली कार काढण्यास सांगत बेदम मारहाण, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रस्त्याच्या कडेला पार्क केलेली चारचाकी गाडी बाजूला घेण्यास सांगून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच मुलीला शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार 23 जानेवारी रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मांजरी खुर्द येथे घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (lonikand Police Station) दोघावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत रोहिदास उद्धव खराबे (वय-52 रा. लेन नं. 7, मांजरी बुद्रुक) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रोहित अशोक आव्हाळे, करण मानाजी आव्हाळे (दोघे रा. आव्हाळवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506, 352, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास खराबे यांचा राहत्या घरासमोर वॉटर प्लांट आहे.
त्याठिकाणी काम करत असताना त्यांच्या ओळखीचे आरोपी आले.
आरोपींनी शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला पार्क केलेली तुझी कार काढ असे सांगितले. त्यावेळी खराबे यांनी ही जागा माझ्या खाजगी मालकीची आहे, मी तुझ्या वडिलांशी बोलतो असे सांगितले. याचा राग आल्याने रोहित लाकडी दांडके घेऊन आला. आरोपींनी फिर्यादी यांना भिंतीवर दाबून करणने गुडघ्यावर लाथा मारल्या. यात खराबे गंभीर दुखापत केली आहे. यावेळी फिर्यादी यांची मुलगी वडिलांना सोडवण्यासाठी आली असता तिला ढकलून दिले. तिला शिवीगाळ करुन बघुन घेतो अशी धमकी दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Alandi Crime | खळबळजनक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

Maratha Reservation | मराठा आरक्षण लढ्याला यश ! सर्व मागण्या मान्य, सरकारने अखेर अध्यादेश काढला, विजयी सभा लवकरच

Maratha Reservation | मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’चा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींनाही फायदा; काय नेमके म्हटले आहे अध्यादेशात, कसा होणार इतरांनाही फायदा, जाणून घ्या

Pune Viman Nagar Crime | अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या विराज रविकांत पाटील याच्यावर पुण्यात गुन्हा; पिस्तूल डोक्याला लावून धमकावले

पुणे : तरुणीला मारहाण करुन अंगावरील कपडे फाडले, सात जणांवर FIR

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा