Pune Crime News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : तरूणीच्या कुटंबियांनी लग्नाचे स्थळ नाकारले म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रूपेश वसंत मोरे, बिल्डर अनुज गोयल यांच्याकडे खंडणी मागणार्‍याला अटक, जाणून घ्या प्रकरण (Video)

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime News | पुणे शहरातील राजकीय नेत्यांना आणि नामांकित बिल्डरकडे खंडणी मागणार्‍याला पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 2 ने (Anti Extortion Cell Pune) अटक केली आहे. त्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे (Bhosari MLA Mahesh Landge), माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश वसंत मोरे (Rupesh Vasant More), नामांकित बिल्डर अनुज गोयल (Builder Anuj Goyal) आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे (Avinash Ramesh Bagwe) यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्याच्याकडे राजकीय नेत्यांचे, प्रसिध्द व्यक्तींचे फोटो, त्यांच्या माहितीचे स्क्रिनशॉट, वेगवेगळे मॅरेज सर्टिफिकेट्स तसेच हॅकिंग केलेले WhatsApp क्रमांकाचे ओटीपी स्क्रीन शॉट मिळुन आल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Pune Crime News)

शाहनवाज गाझीयखान Shahnawaz Ghazikhan (31, रा. मकसा मस्जिदजवळ, गुरूवार पेठ, पुणे. सध्या रा. फझाने मस्जिद समोर, कोंढवा बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे मेरेज ब्युरो (Pune Marriage Bureau Group) हा ग्रुप सन 2020 पासुन सुरू असून त्या ग्रुपचा अ‍ॅडमीन इम्रान समीर शेख Imran Sameer Shaikh (37, रा. घोरपडीगाव, पुणे) हा होता. सन 2020 मध्ये इनोव्हा कार नंबर एमएच 12 क्युआर 7860 या गाडीच्या मालकाच्या पुतणीचा बायोडाटा तिच्या आईने पुणे मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये टाकला होता. ग्रुप अ‍ॅडमीन इम्रान शेखने सदर मुलीसाठी शाहनवाज गाझीयाखानचे स्थळ सुचविले होते.
मात्र, तरूणीच्या घरच्या लोकांनी शाहनवाजचे स्थळ नाकारले. त्यानंतर ग्रुप अ‍ॅडमीन इम्रान शेखने बनावट नावाने तरूणीच्या आईशी व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग करून सदर तरूणीचे लग्न स्वतःशी लावून देण्याची मागणी केली. त्यानंतर सदर तरूणी घटस्फोटित असल्याचा बनावट बायोडाटा बनवुन तो ग्रुपमध्ये पाठवुन बदनामी केली. याबद्दल इम्रान शेख याच्याविरूध्द दि. 27 मार्च 2022 रोजी चंदननगर पोलिस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

आरोपी इम्रान शेखने त्यानंतर स्वतःचा आणि सदर तरूणीचा फोटो वापरून बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवुन ते मॅरेज सर्टिफिकेट सर्वग्रुपवर व्हायरल केले. त्याबद्दल देखील त्याच्याविरूध्द चंदननगर पोलिस ठाण्यात इम्रान शेख आणि शेख जलील शेख खलील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी माजी नगरसेवक बाबा उर्फ दिपक धोंडीबा मिसाळ (Baba Alias Deepak Dhondiba Misal) यांना वेगवेगळया व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून धमकी देवुन खंडणी मागण्यात आली होती. बिबवेवाडी पोलिस ठाण्यात (Bibvewadi Police Station) दाखल असलेल्या गुन्हयात इम्रान शेख हा आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्याला सदरील गुन्हयात अटक करण्यात आली होती. आरोपी इम्रान शेखने पुन्हा सदर तरूणीचा फोटो वापरून फेसबुकवर अकाऊंट तयार करून अश्लील फोटो मॉर्फ करून प्रसारित केले होते. त्यामध्ये देखील वेगळा गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी इम्रान शेखला अटक करण्यात आली होती.

काही महिन्यानंतर आरोपी शाहनवाज गाझीयखान हा अ‍ॅक्टिव्ह झाला. शाहनवाज आणि इम्रान शेख हे पुणे मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये एकत्र होते. आरोपी शाहनवाज गाझीयखानने माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश वसंत मोरे, नामांकित बिल्डर अनुज गोयल, माजी नगरसेवक अविनाश रमेश बागवे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे खंडणी मागुन ती रक्कम खराडी परिसरातील ईवॉन आयटी पार्क समोरील इनोव्हा गाडी क्रमांक एमएच 12 क्युआर 7860 मध्ये ठेवण्यास सांगितली होती. याप्रकरणी अनुक्रमे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station), बंडगार्डन पोलिस स्टेशन (Bundgarden Police Station), समर्थ पोलिस स्टेशन (Samarth Police Station) आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad Police) भोसरी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari Police Station) गुन्हे दाखल आहेत.

केवळ आणि केवळ सदरील तरूणीच्या कुटुंबियांना त्रास व्हावा याच उद्देशाने आरोपी शाहनवाजने हे सर्व उद्योग केले आहेत.
दरम्यान, गुन्हयांची कार्यपध्दत पाहता गुन्हयांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी 5 पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी युध्दपातळीवर तपास करून आरोपी शाहनवाज गाझीयखानला अटक केली आहे.
त्याच्याकडे विविध राजकीय नेते, प्रसिध्द व्यक्तींचे फोटो, माहितीचे स्क्रिन शॉट, वेगवेगळे मॅरेज सर्टिफिकेट्स
तसेच हॅकींग केलेले व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाचे ओटीपी स्कीन शॉट्स मिळुन आले आहेत.
आरोपी आणखी 4 राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींकडे खंडणी मागण्याच्या तयारीत होता.
पोलिसांनी सर्व पुरावे जप्त केले असून आरोपीने सखोल तपासाअंती सर्व गुन्हयांची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर
(Sr PI Pratap Mankar), सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav), पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव (PSI Ajay Jadhav), पोलिस अंमलदार विजय गुरव,
विनोद साळुंके, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे,
सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेंगडे, पवन भोसले, चेतन शिरोळकर,
किशोर बर्गे, प्रदिप गाडे, मारोती नलवाड, सागर घोरपडे, अभिनव लडकत, अनिकेत बाबर, अय्याज दड्डीकर
आणि दरेकर यांनी केलेली आहे.

Web Title :-  Pune Crime News | Pune Police Crime Branch Arrested Criminal Who Demand Extortion Money From Bhosari MLA Mahesh Landge, former corporator Avinash Bagwe, Rupesh Vasant More, builder Anuj Goyal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा