Pune Crime News | पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोटच्या अल्पयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नराधम बापावर समर्थ पोलिसांनी (Samarth Police) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2024 ते एप्रिल 2024 दरम्यान नानापेठेत घडला आहे.(Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 31 वर्षीय आईने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नराधम बापावर आयपीसी 354(अ), 323 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची मुलगी घरातील बेडवर मोबाईल बघत होती. त्यावेळी आरोपीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण केले. तसेच आरोपीने दारु पीऊन घरी आल्यानंतर मुलीला मारहाण करत असल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

हडपसर : 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी तरुणावर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांजरी बुद्रुक येथे सोमवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे.

याबाबत पीडित 16 वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन निखील शिरीष थोरात
Nikhil Shirish Thorat (वय-19 रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(ड) सह पोक्सो कायद्यांतर्गत
गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील व भाऊ बाहेर गेल्यानंतर आरोपी
पीडित मुलीच्या घरी आला. त्याने पीडित मुलीला लग्नाची मागणी घालून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
आरोपी मागील काही दिवसांपासून वारंवार पाठलाग करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार