Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार

जुन्नर : Sharad Pawar On PM Narendra Modi | माझा आत्मा हा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. असे सडेतोड प्रत्त्युत्तर जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना दिल.

शिरुर मतदार संघातील (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर (Otur Sabha) मध्ये जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे,  बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार,अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.(Sharad Pawar On PM Narendra Modi)

शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाल्याच सांगत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

पवार म्हणाले की, पंतप्रधान काल म्हणाले ईडी चा मी एक टक्का ही वापर करत नाही. जे चांगलं काम करतात त्यांचा विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या मोदींना शरद पवारांनी सुनावले खडेबोल

राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? म्हणताना मोदींना कायतरी वाटायला हवं, अस शरद पवार म्हणाले. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. अधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगतआहेत. चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया