Pune Crime News | अभ्यासक्रमातून काढल्याच्या रागातून इन्स्टिट्यूट चालकाला भोसकले, पुण्यातील जंगली महाराज रोडवरील घटना; आरोपी विद्यार्थ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अभ्यासक्रमातून काढल्याचा राग मनात धरुन एका विद्यार्थ्याने इन्स्टिट्यूट चालकास चाकूने (Attempt To Kill) भोसकल्याची घटना पुण्यातील जंगली महाराज रोडवरील (JM Road Pune) कर्निक प्लाझा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

यामध्ये संकल्प योगेश जांदे (वय-23 रा. आंबेगाव बु. जांभुळवाडी रोड, कात्रज) हे जखमी झाले असून त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. तर ऋषिकेश अशोक नाडे Rishikesh Ashok Nade (रा. डेक्कन कॉर्नर, एफसी रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावरील कर्णिक प्लाझा इमारतीमध्ये
आयटी प्रिन्यूअर नावाचे इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी आयटीचे अभ्यासक्रम शिकवले जातात.
आरोपी विद्यार्थ्याची वर्तवणुक चांगली नसल्याने जांदे यांनी त्याला अभ्यासक्रमातून काढून
टाकण्याचा ईमेल केला होता. याचा राग मनात धरुन आरोपी विद्यार्थ्याने अभ्यासक्रमात प्रवेश द्या, नाहीतर जीवे मारतो अशी धमकी देत जांदे यांच्या पोटावर वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगार छोट्या बलकवडे याच्यावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 53 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे विद्यापीठात चोरी, चतु:श्रृंगी पोलिसांकडून चोरटा गजाआड

सराईत चोरटा कोंढवा पोलिसांकडून गजाआड, तीन गुन्हे उघडकीस