Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यासह त्याच्या मित्राला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी (molestation case) २४ वर्षीय तरूणासह त्याच्या २० वर्षीय मित्राला न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष पॉक्सो न्यायाधीश के. के. जहागीरदार (Special Poxo Judge K. K. jahagirdar) यांनी हा निकाल दिला. श्रीमंत शांतय्या स्वामी (वय २४) याला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर त्याचा मित्र शंकर ऊर्फ शिवशंकर सिधय्या स्वामी (वय २०, दोघेही रा. चिखली) यास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडची शिक्षा ठोठावण्यात आली. Pune molestation case | Punishment of his friend, including the one who molested a minor girl

ही घटना १३ मे २०१९ रोजी चिखली परिसरात घडली. आरोपी हे पिडीतेच्या घरासमोरील चाळीत राहत होते. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी ही श्रीमंत यास भेटण्यास गेली असता त्याने तिला घरात बोलाविले. यावेळी त्याठिकाणी असलेला त्याचा मित्र शिवशंकर हा घराबाहेर निघूल गेला. जातेवेळी त्याने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर श्रीमंत याने आपण दोघे लग्न करूयात असे म्हणत विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे (Special Public Prosecutor Arundhati Brahma) यांनी पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी चार साक्षीदार तपासले. या करणाचा तपास यु. बी. ओमासे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस निलेश दरेकर यांनी सहकार्य केले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title :  Pune Crime News | Punishment of his friend, including the one who molested a minor girl

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल;
प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी