Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला सहकारनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सहकारनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत (Mcoca Action) कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईनंतर चार महिने फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून अटक केली आहे. साहिल आनंत काथवटे Sahil Anant Kathawate (रा. आण्णाभाऊ साठे वसाहत, अरणेश्वर पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

सहकारनगर येथे 27 जुलै रोजी झालेल्या दोन गटातील भांडणावरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी एका गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपी अनंत काथवटे फरार होता. पोलीस त्याचा चार महिन्यापासून शोध घेत होते.

दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींचा सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शोध घेत होते. पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale), पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांना माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यात चार महिने फरार असलेला आरोपी साहील काथवटे हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी ओसवाल वॉटर प्लॅट शेजारी असलेल्या ओम श्री बिल्डींगजवळ इंदिरानगर बिबवेवाडी येथे येणार आहे. तसेच तो पर-राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इंदिरानगर बिबवेवाडी येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. (Pune Crime News)

ही पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग
नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुशांत फरांदे, महेश मंडलिक,
बजरंग पवार, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, भुजंग इंगळे, अमोल पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर,
विशाल वाघ यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका, ”…तेव्हा आम्ही गप्प बसलो”