Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका, ”…तेव्हा आम्ही गप्प बसलो”

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार (Ajit Pawar On Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पक्षात फूट का पाडली आणि सत्तेत सहभागी का झालो, याची कारणे यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) सांगितली. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी का झालो, याबाबत अजित पवार म्हणाले, राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामे होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचे भले होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, ही साधी गोष्ट नाही. आम्हीही ३०-३५ वर्षे
समाजकार्य-राजकारण (Maharashtra Political News) केले आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे.
वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितले त्याची अंमलबजावणी केली, हे सगळ्यांना माहीत आहे. (Ajit Pawar On Sharad Pawar)

अजित पवार म्हणाले, २०१४ साली आमच्या वरिष्ठांनी (शरद पवार) भाजपाला (BJP) बाहेरून पाठिंबा दिला.
तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेक घटना घडल्या.
त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खेड शिवापूर, हवेली परिसरात घरफोडी करणारा सराईत चोरटा गजाआड, पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त