Pune Crime News | तडीपार असताना घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तडीपार (Tadipar) असताना पुणे शहरात घरफोडी (Burglary In Pune) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) रास्ता पेठेतील मनुशाह मस्जिद जवळ केली. सुमित फ्रँकी हॉल (वय-30 रा. पुणे कॅम्प) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार रहीम शेख (Police Constable Rahim Shaikh) व हेमंत पेरणे (Hemant Perne) यांना माहिती मिळाली की, एक संशयीत व्यक्ती रास्ता पेठेतील (Rasta Peth) मनुशाह मस्जिद जवळ उभा असून त्याच्याकडे असलेल्या गोणीमध्ये काही वस्तु आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता एक संशयित व्यक्ती हातात गोणी घेऊन उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपीने गोणी त्या ठिकाणी टाकून पळून जावू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. (Pune Crime News)

पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणून गोणीतील सामानाबाबत विचारणा केली असता त्याने हे साहित्य रेडचिल्ली हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या बंद भंगाराच्या गोडावूनमधून चोरल्याचे सांगितले. आरोपीचे पोलीस रेकॉर्ड तपासले असता सुमित हॉल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत 14 गुन्हे दाखल असून त्याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार असताना त्याने शहरात घरफोडीचा गुन्हा केला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (DCP Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ
(ACP Ashok Dhumal), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे (Senior PI Suresh Shinde),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे (PSI Sunil Randive), सौरभ थोरवे, पोलीस अंमदार रहीम शेख, हेमंत पेरणे,
दत्तात्रय भोसले, रोहीदास वाघेरे, सोमनाथ धगे, जितेंद्र पवार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, अमोल शिंदे,
ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शरद घोरपडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Multibagger Stocks | ४८ रुपयांचा शेअर ४८०० च्या पार… या हॉस्पिटल स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती

Financial Rules Changing in Sep 2023 | हे नियम बदलणार, नुकसान टाळण्यासाठी आजच पावले उचला