Multibagger Stocks | ४८ रुपयांचा शेअर ४८०० च्या पार… या हॉस्पिटल स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती

नवी दिल्ली : Multibagger Stocks | शेअर बाजारात (Stock Market) चढ-उताराच्या व्यवहारांदरम्यान अनेक असे शेअर सुद्धा आहेत, जे गुंतवणुकदारांचे नशीब बदणारे ठरले आहेत. असाच एक स्टॉक आहे अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस (Apollo Hospitals Enterprise) चा, ज्याने लाँग टर्ममध्ये आपल्या इन्व्हेस्टर्सला मजबूत रिटर्न दिला आहे आणि एक लाख रुपयांची गुंतवणूक (Investment) एक कोटी रुपयांपेक्षा जास्त केली आहे. (Multibagger Stocks)

स्पष्ट शब्दात बोलायचे तर हा हॉस्पिटल स्टॉक गुंतवणुकदारांना करोडपती बनवणारा ठरला आहे.

एक लाखाची गुंतवणूक झाली १ कोटीपेक्षा जास्त
शेअर बाजारात लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Return) देणारे अनेक शेअर आहेत, परंतु Apollo Hospitals Enterprise Stock बाबत बोलायचे तर त्याने २० वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे.

ज्या गुंतवणुकदारांनी या कालावधीसाठी एक लाख रुपयांची गुंतवणुक करून ठेवली होती, त्यांचे एक लाख रुपये आता वाढून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असतील. मार्च २००३ च्या अखेरपासून २९ ऑगस्ट २०२३ पर्यंत या स्टॉकच्या किंमतीत ४८२३ रुपये वाढले आहेत.

२००३ पासून २०२३ पर्यंत इतके वाढले पैसे
२८ मार्च २००३ ला अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेसच्या शेअरचा भाव केवळ ४८.२८ रुपयांवर होता आणि २९ ऑगस्ट २०२३ ला शेअर बाजार बंद झाला तेव्हा तो ४८७२ च्या स्तरावर होता. ७०,०१९ कोटी रुपये मार्केट कॅपिटलायजेशनच्या या कंपनीवर ज्या गुंतवणुकदारांनी लाँग टर्मसाठी विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी हा स्टॉक नशीब उघडणारा ठरला आहे. (Multibagger Stocks)

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक स्तर ५,३६२.०० रुपये तर ५२ आठवड्यांचा निचांक स्तर ४,०७८.४० रुपये आहे.
मंगळवारी व्यवहारादरम्यान ४,९३८ रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता, परंतु व्यवहाराच्या अखेरीस ०.६० टक्केच्या
घसरणीसह बंद झाला.

सातत्याने गुंतवणुकदारांना देतोय लाभ
या हॉस्पिटल स्टॉकच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर त्याने लिस्ट झाल्यापासून आतापर्यंत गुंतवणुकदारांना २६,२५१.३५
टक्के रिटर्न दिला आहे. तर मागील पाच वर्षात या शेअरद्वारे मिळालेला रिटर्न पाहिला तर तो ३११.३४ टक्के आहे.
मागील वर्षात या स्टॉकच्या किंमतीत १३ टक्के वाढ दिसून आली.

सहा महिन्यात सुद्धा अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेसचा शेअर गुंतवणुकदारांसाठी लाभदायक ठरला आहे.
या काळात त्याने १०.४० टक्के रिटर्न दिला आहे. मात्र, मागील एक महिन्यात या शेअरच्या किमतीत ६ टक्के घट नोंदली गेली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ओंकार बाणखेले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दुहेरी मोक्क्यातील टोळी प्रमुख सुधीर थोरात याला जामीन मंजुर

ACB Trap News | लाच घेताना सिडकोचे महाव्यवस्थापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात