Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दुर्देवी : शेततळयात बुडून बापलेकाचा मृत्यु, मदत मिळाल्याने आई वाचली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka Crime) जांबुत (Jambut) येथील चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्रामधील (Charangbaba Krushi Paryatan Center) शेततळयात (Shet Tale) बापलेकाचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या आईला वेळेवर मदत मिळाल्याने त्या वाचल्या आहेत. (Pune Crime News)

सत्यवान शिवाजी गाजरे (28) आणि राजवंश सत्यवान गाजरे (दीड वर्ष) अशी मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत. राजवंशची आई स्नेहल सत्यवान गाजरे (25) यांना वेळेवर मदत मिळाल्याने वाचल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, बेल्हे-जेजुरी महामार्गावरील (Belhe – Jejuri State Highway) जांबुत (पंचतळे) येथे चारंगबाबा हॉटेल व कृषी पर्यटन केंद्र असून ते शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे आहे. (Pune Crime News)

रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिवाजी यांचा मुलगा, सून आणि नातु हे तिघे हॉटेल परिसरात होते.
परिसरात शेततळे आहे. स्नेहल आणि सत्यवान हे कामात असताना राजवंश हा खेळता-खेळता शेततळयात
जावुन पडला. त्याला वाचविण्यासाठी सत्यवान यांनी तळयाकडे धाव घेतली आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.
पण त्यांना देखील पोहता येत नव्हते त्यामुळे तेही बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी स्नेहल यांनी पाण्यात उडी मारली.
त्यांना देखील पोहण्यास येत नव्हते. त्यामुळे त्या देखील बुडत होत्या.

सत्यवान यांचे बंधू किरण आणि वेटर यांना गोंगाट ऐकु आल्याने ते दोघे त्यांना वाचविण्यासाठी धावले.
त्यांना स्नेहल यांना वाचविण्यात यश आले. सत्यवान आणि राजवंश यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांना जांबुत
येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर आळे येथे रूग्णालयात नेले मात्र त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

Web Title :  Pune Crime News | Shirur Crime : Father And Son dies after drowning in farm field, mother survives after getting help

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

Pune Crime News | पुणे पोलिसांकडून शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात रा. नं. साळुंखेला अटक

Chandrakant Patil | ग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमाची गरज- पालकमंत्री चंद्रकांत पाटील