Pune Crime News | प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0
124
Pune Crime News | Shivajinagar police action against smugglers of banned Gutkha, goods worth three lakhs seized
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात अवैध गुटख्याची वाहतूक (Gutka), विक्री आणि साठा करुन ठेवणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीतून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करुन पोलिसांनी वाहनासह 2 लाख 88 हजार 896 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) शुक्रवारी (दि.3) रात्री दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर पादुका चौकात (Dnyaneshwar Paduka Chowk) करण्यात आली.

याप्रकरणी टेम्पो चालक ज्ञानेश्वर दादासाहेब जगताप (वय-28 रा. वडारवस्ती, कर्वेनगर-Karve Nagar, पुणे) याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 188, 272, 273, 328 व अन्न सुरक्षा मानके कायदा (The Food Safety Standards Act), अन्न सुरक्षा मानदे कायदा प्रोहिबिशन ॲन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस हवालदार रणजित फडतरे यांना ज्ञानेश्वर पादुका चौकात एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो (एमएच 12 एफ डी 8349) मधून गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एफ.सी रोडवरील (FC Road) ज्ञानेश्वर पादुका चौकात सापळा रचून छोटा हत्ती अडवला. टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये 38 हजार 896 रुपयांचा प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि अडीच लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 2 लाख 88 हजार 896 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल
(DCP Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने
(Senior Police Inspector Arvind Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड
(Police Inspector Vikram Goud), सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे
(API Bholenath Ahivale), पोलीस अंमलदार रणजित फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी,
अविनाश भिवरे, प्रविण राजपुत, अतुल साठे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Shivajinagar police action against smugglers of banned Gutkha, goods worth three lakhs seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई ! खडक, भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, वानवडी, हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर परीसरात गुटखा विक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

Kolhapur Crime News | दुर्दैवी ! खेळत असताना पिठात पडल्यामुळे नाकातोंडात पीठ जाऊन 9 महिन्यांच्या बालकाचा अंत

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस