Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दिकीची (Nawazuddin Siddiqui) ओळख आहे नवाजुद्दीनने आज विविध धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र आता अभिनेता त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये संकटात आला आहे. नवाजुद्दीनच्या (Nawazuddin Siddiqui) पत्नीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. त्यानंतर न्यायालयाने नवाजुद्दीनला नोटीस बजावली आहे.

यापूर्वी देखील नवाजुद्दीनची पत्नी आलियाने नवाजुद्दीनच्या आईवर आरोप केला होता. त्यानंतर आता तिने अभिनेत्यावर देखील आरोप करत तक्रार दाखल केली आहे. यावेळी तिने म्हटले की आपल्याला घरातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. तिला वेळोवेळी वाईट वागणूक देण्यात येत होती. तर घरातील किचन आणि बाथरूम वापरण्याचे परवानगी तिला दिली नव्हती. तर तिचे अन्न पाणीदेखील बंद करण्यात आले होते. असे अनेक धक्कादायक खुलासे यावेळी आलियाने केले आहे. (Nawazuddin Siddiqui)

आलियाच्या तक्रारीनंतर कोर्टाने नवाजुद्दीनला नोटीस बजावली आहे.
यावेळी आलियाच्या वकीलने म्हटले की नवाजुद्दीनच्या आईला आलिया नवाजुद्दीन ची पत्नी म्हणून मान्य नव्हती.
दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे.
जर त्यांचे घटस्फोट झाला असेल तर त्यांच्या सर्व कागदपत्रांवर अजूनही पत्नीच्या ठिकाणी आलियाचे नाव का लावण्यात आले आहे.
यापूर्वी आलिया दुबईत राहत होती. मात्र ती भारतात परत येऊन नवाजुद्दीनच्या घरी राहू लागली.
2020 मध्ये दोघांनी संगणमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी कायदेशीर नोटीशी देखील बजावली होती. परंतु नंतर सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय त्यांनी बदलला होता. आता या नोटीशीमुळे नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Nawazuddin Siddiqui | nawazuddin siddiqui in trouble after wife allegations notice issued by the court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri-Chinchwad Crime | किरकोळ कारणावरुन टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, तीन जणांना अटक; चाकण परिसरातील घटना

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, Video आला समोर

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड