पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला सिंहगड रोड पोलिस स्टेशनमधील (Sinhagad Road Police Station) अधिकारी व पोलिस अंमलदारांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 30 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त (Pistol Seized) केला आहे. (Pune Crime News )
वैभव विजय वाल्हेकर Vaibhav Vijay Walhekar (29, धंदा – चहाची टपरी, रा. मु.पो. कामथडी, ता. भोर, जि. पुणे – Bhor Pune) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हे रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयित व्यक्तींना चेक करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अमोल तांबे आणि माने यांना एकजण पिस्तुलची विक्री करण्यासाठी नर्हे येथील ग्रॅन्ड व्ह्यु हॉटेलच्या (Hotel Grand View Inn In Narhe Gaon, Pune) जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Crime News)
पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यावेळी पिस्तुल विक्रीसाठी आलेला वैभव वाल्हेकर हा नजर चुकवुन पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल आणि काडतुस आढळून आले. पोलिसांनी 30 हजार 500 रूपयाची हत्यारे त्याच्याकडून जप्त केली आहे. त्याच्याविरूध्द सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे
(ACP Rajendra Galande), वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन (Senior PI Abhay Mahajan),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल यादव, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलिस अंमलदार रविंद्र आहिरे,
अमोल तांबे, कुंभार आणि माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune Crime News | Sinhagad Road Police Arrest Vaibhav Vijay Walhekar Near Narhe Hotel Grand View Inn
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा