Pune : विनाकारण कारची तोडफोड करत एकाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विनाकारण कारची तोडफोड करत एकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लोणी काळभोर येथील कवडीपाट टोल नाक्याजवळ हा प्रकार बुधवारी घडला आहे. याप्रकरणी विलास चांगदेव वाघमारे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या उर्फ प्रणव संजय घुमस्ते (वाडकर) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांची कार घेऊन थांबले होते. यावेळी आरोपी आला. त्याने काही एक कारण नसताना फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच कारची तोडफोड केली आहे.

उत्तमनगरला एकावर कोयत्याने वार
डंपर चालविण्यासाठी चावी न दिल्याच्या रागातून दोघांनी डंपर चालकावर कोयत्याने वार केले. डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उत्तमनगर परिसरात घडला आहे.
याप्रकरणी डंपर चालक किसन महादेव थोरात (वय ४०, रा. वारजे गावठाण) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दादू जेवीअर कॉलविल व अखिल मायकल थॉमस (रा. कोपरे रोड, उत्तमनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कॉलविल हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. फिर्यादी व आरोपी यांची तोंड ओळख आहे. फिर्यादी यांना आरोपींनी डंपरची चक्कर मारण्यासाठी चावी मागितली होती. पण ती म दिल्याने या दोघांनी मारहाण केली आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.