Pune Crime News | पत्नी व प्रियकराने संगनमताने पतीचा काढला काटा, पोलिसांनी दोन तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या; पुणे जिल्ह्यातील घटना

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अनैतिक संबंधास (Immoral Relationship) विरोध करणाऱ्या पतीचा प्रियकराने (Boyfriend) केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नी, प्रियकर आणि त्याचा साथीदार या तिघांवर खुनाचा (Murder News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर भीमराव कांबळे (रा. टेंभुर्णीवेस नाका, इंदापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे Pinesh alias Mayur Mahendra Dhainje (रा. टेंभुर्णीवेस नाका परिसर, इंदापूर), विजय नागनाथ शेंडे Vijay Nagnath Shende (रा. अंबिकानगर, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत मृताचे वडील भीमराव सुदाम कांबळे (वय-60 रा. आबेगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ईश्वर कांबळे हे फिर्यादी यांचा मोठा मुलगा आहे. त्याला दोन मुले आहेत. दीड वर्षापूर्वी ईश्वरच्या पत्नीचे आणि सासरच्या लोकांचे भांडण झाले होते. त्यानंतर ती ईश्वर व मुलांना घेऊन आपल्या माहेरी बाभुळगाव (ता. इंदापूर) येथे आली. काही दिवसांनी ती नवऱ्यासह इंदापूर मधील टेंभुर्णी वेस नाका परिसरात भाड्याने घर घेऊन राहु लागली.

दरम्यान, तिचे आणि घराजवळ राहणाऱ्या पिनेश उर्फ मयुर धाईंजे याच्याबरोबर अनैतिक संबंध निर्माण झाले. याची कल्पना ईश्वरने वडिलांना दिली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी ही बाब सुनेच्या आई-वडिलांच्या कानावर घातली. पिनेशला देखील समजावून सांगण्यात आले. मात्र, त्याच्या किंवा ईश्वरच्या पत्नीच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही. पिनेश याच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे इश्वर सतत सांगत होता. (Pune Crime News)

सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) रात्री दहाच्या सुमारास पिनेश धाईंजे व विजय शेंडे यांनी संगनमत केले.
अनैतिक संबंधाच्या कारणावरुन घरी जाऊन ईश्वरसोबत वाद घातला. त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिनेश याने
सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने ईश्वरच्या पोटावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर तिघे ही तेथून पळून गेले.
जखमी ईश्वरला त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (दि.25) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

इंदापूर पोलीस ठाण्याचे (Indapur Police Station) पोलीस निरीक्षक दिलीप पवार (PI Dilip Pawar) यांनी सांगितले की,
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात अकलूज च्या दिशेने पळून गेलेल्या तीन ही आरोपींना ताब्यात घेतले.
यातील विवाहित महिला जखमी असून तिच्यावर दवाखान्यत उपचार करण्यात आले आहेत.
फिर्याद दिल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
त्यामध्ये बदल करुन खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thackeray Group On CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे स्वतः हमास, उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यातील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची टीका भाजपा नेत्यांच्या जिव्हारी, शेलार म्हणाले – ‘आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे…’