Pune Crime News | पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून महिलेचा खून, महिलेसह पतीला अटक; मावळ मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून तिघांनी संगनमत करुन महिलेच्या डोक्यात दगड मारुन खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह चांदखेड गावच्या हद्दीतील डोंगराच्या पायथ्याला झुडपात पुरला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार 16 जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घडला आहे.

सुनंदा लक्ष्मण चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय-28 रा. पाचाणे ता. मावळ), गणेश उर्फ लहु रामभाऊ चव्हाण व एका महिलेवर 302, 201, 34 नुसार गुन्हा दाखल करुन लक्ष्मण व एका महिलेला अटक केली आहे. तर गणेश उर्फ लहु चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबबत सुनंदा यांचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय-28 रा. केळवडे ता. भोर, मुळ रा. रिसोड ता. रिसोड, जि. वाशिम) यांनी शुक्रवारी (दि.19) शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेचा दिर गणेश उर्फ लहु चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन चाकण परिसरात अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे चाकण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान, मयत सुनंदा चव्हाण हिने गणेश चव्हाण याला तीन वर्षापूर्वी पोलिसांना पकडून दिले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता.भावाला पकडून दिल्याने आरोपींनी संगनमत करुन सुनंदा हिच्या डोक्यात दगड मारुन खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह चांदखेड गावच्या हद्दीतील डोंगरालगत असलेल्या झाडीत पूरला.

फिर्यादी शाम चव्हाण यांनी त्यांची बहिण सुनंदा चव्हाण हिला अनेकवेळा फोन केला. मात्र तिने फोन उचलला नाही. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सुनंदा हिच्या पतीसह नातेवाईंकडे कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी खुन करुन मृतदेह डोंगरालगत असलेल्या झुडपात पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | रोडवर गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांचा सज्जड दम

Pune Pimpri Chinchwad Crime News | रक्षकच बनला भक्षक, पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल