Pune Crime News | तडीपार गुंडाचा येरवड्यात राडा

पुणे : Pune Crime News | पुणे व शहर जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात येऊन पालघनने येणार्‍या जाणार्‍यांना धमकावित येरवड्यात गुंड दहशत माजवित होता. येरवडा पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

विजय गणेश राठोड Vijay Ganesh Rathore (वय २२, रा. नाईकनगर, येरवडा – Yerwada News) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल परदेशी (Police constable Rahul Pardeshi) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०८/२३) दिली आहे. विजय राठोड याला पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh) यांनी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही विजय राठोड हा शहरात रहात होता. रविवारी रात्री ८ वाजता तो गेनबा शाळेजवळ हातात पालघन घेऊन येणार्‍या जाणार्‍यांना शिवीगाळ करुन धमकावित होता. त्याच्या आरडाओरडामुळे लोक पळून जात होते. याची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad), उपनिरीक्षक विशाल पाटील (Sub Inspector Vishal Patil) व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून तो पळून जात होता. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. तडीपारीचा भंग करुन हत्यार बाळगल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

Web Title :- Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Offer To Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरे यांना राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची ऑफर; थेट CM उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा

Pune Crime | भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 2.71 लाखाचा मुद्देमाल जप्त