Pune Crime News | ‘मी आयुष्य संपवतोय…’ मित्राला WhatsApp वर चिठ्ठी पाठविल्यानंतर युवकाने उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | युवकाने खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) उडी मारून आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापुर्वी ‘मी आत्महत्या करत आहे, माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये’ अशी चिठ्ठी (Suicide Note) लिहून मित्राला WhatsApp वर पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

अनिकेत सुनील आल्हाट Aniket Sunil Alhat (21, रा. नर्‍हे, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 मे 2023 रोजी पहाटे अनिकेत घरातून कोणाला काही एक न सांगता बाहेर पडला होता. त्याने आपण आत्महत्या करत असून त्याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठ्ठील लिहून ती मित्राच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविली होती. (Pune Crime News)

अनिकेतच्या मित्राने तात्काळ त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना कळविले.
त्यानंतर अनिकेतच्या घरच्यांनी तो हरविल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये
(Bharti Vidyapeeth Police Station) दिली होती. दि. 25 मे 2023 पासून अनिकेतचा मोबाईल बंद येत होता.
कुटूंबियांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.
शेवटी अनिकेतचा मृतदेह खडकवासला धरणाच्या पाण्यावर पंप हाऊसजवळ तरंगताना आढळून आला.
त्यावरून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title :  Pune Crime News | Young Boy Suicide In Khadakwasla Dam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप