Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे (Shivsena) समर्थक आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) आणि भाजप (BJP) समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यात वाद सुरु आहेत. पुन्हा एकदा बच्चू कडू आणि रवी राणा हे आमने सामने आले आहेत. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर (Amravati Lok Sabha Constituency) दावा केला आहे. बच्चू कडू यांच्या या नव्या खेळीमुळे शिवसेना-भाजप समोरील अडचणीत वाढ झाली आहे. तर रवी राणा हे देखील आक्रमक झाले आहेत. (Maharashtra Politics News)

आमदार बच्चू कडू यांनी दावा केलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा आहे. नवनीत राणा या भाजपच्या निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी देखील या जागेवर दावा केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Maharashtra Politics News)

बच्चू कडू यांच्या दाव्यावर बोलताना रवी राणा म्हणाले, अमरावतीमधून 2024 ची लोकसभा निवडणूक नवनीत राणा याच लढवणार आहेत. जे आज दावा करत आहेत ते उद्या प्रचार करतील, असा टोला राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला आहे. ते पुढे म्हणाले, देशात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं सरकार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या पक्षाचे आणि आमचे प्रमुख आहेत. मोदींजींसोबत स्वत: खासदार म्हणून नवनीत राणा यांची चर्चा झाली आहे. मी अमित शाह (Amit Shah) यांना अनेकवेळा भेटलोय. महत्त्वाचं म्हणजे आमच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे आहेत.

देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी असल्याने कोण कुठली जागा मागतंय आणि कुणाला कुठली जागा
द्यायची याबाबतचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस घेतील. कोणी कितीही दावे केले तरी
ते खोडून काढण्याची ताकद या रवी राणामध्ये आहे, असा ईशारा रवी राणा यांनी बच्चू कडूंना दिला.
ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Web Title :  Maharashtra Politics News | Bachchu kadus claim on amravati lok sabha constituency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक …’ (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Pune News | हौशी बैलगाडा मालकाने घोडीला आणले महागड्या फॉर्च्युनर कारमधून; व्हिडीओ तुफान व्हायरल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप