Pune Crime | 35 हजारांचे घेतले दीड लाख रूपये; शेकडा 10 टक्क्यांनी उकळले व्याज, आरोपीला अटक

0
792
Pune Crime | One and a half lakh rupees taken for 35 thousand; Accused arrested for interest at 10 per cent
file photo

पुणे : Pune Crime | शेकडा १० टक्के दराने ३५ हजारांचे तब्बल दीड लाख व्याज उकळूनही दोन लाखांची खंडणी मागणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली. ही घटना फेब्रुवारी २०१७ ते ऑक्टोबर २०२२ कालावधीत नर्‍हे, चिंचवड, बिबवेवाडीत घडली. (Pune Crime)

संतोष बाबुराव शिंदे Santosh Baburao Shinde (वय ४०, रा. सोमाटणे फाटा – Somatne Phata ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (BV Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

फिर्यादी महिलाने २०१७ मध्ये मुलगा आजारी असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी आरोपी संतोषकडून १० टक्के दराने
३५ हजारांची रक्कम घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांनी महिलेने घेतलेल्या रकमेपेक्षा महिलेने आरोपीला दीड
लाख रूपये जास्त दिले होते. तरीही संतोषने त्यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागितली.
पैसे न दिल्यास शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी दिली.
वारंवार धमकी देत फोन करून रात्री अपरात्री शिवीगाळ केली.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कतले यांच्या पथकाने केली.

Web Title :-Pune Crime | One and a half lakh rupees taken for 35 thousand; Accused arrested for interest at 10 per cent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon ACB Trap | क्राईम मिटींगला येण्याच्या तयारीत असलेले 2 पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, संपुर्ण जिल्ह्यात खळबळ

IND vs BAN | बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पाऊसाचा व्यत्यय येणार का?

Sushma Andhare | शिंदे गटातील आमदाराचा सुषमा अंधारे टोला, म्हणाले -‘…अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या’