Sushma Andhare | शिंदे गटातील आमदाराचा सुषमा अंधारेंना टोला, म्हणाले -‘…अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) आणि बाळासाहेबांची शिवसेना Balasahebanchi Shivsena (शिंदे गट) यांच्यात वाद आणि आरोप प्रत्यरोप होत आहेत. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या शिंदे आणि भाजप आमदार, मंत्र्यांचा रोज नवा समाचार घेत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या गटातील आमदाराने देखील सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) टीका केली आहे.

सुषमा अंधारे तीन महिन्यांपूर्वी अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, आमच्यामुळे त्या प्रकाशात आल्या, असे जळगावमधील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) म्हणाले आहेत. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटातील आमदारांचे जाहीर आभार मानले पाहिजेत. कारण, आमच्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या जनतेत ओळख मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाच्यापूर्वी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. त्यामुळे अंधारे यांनी चाळीस बंडखोरांचे मनापासून आभार मानले पाहिजेत, असे देखील किशोर पाटील म्हणाले.

तसेच मागील तीन महिन्यांपूर्वी सुषमा अंधारे कुठे आहेत, हे अंधारात सुद्धा दिसत नव्हते, अशी अंधारेंची स्थिती होती. आम्ही बंड केले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमच्या बंडामुळे त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटात जागा मिळाली आणि त्यांनी भाषणे केली. त्याचमुळे त्यांना लोक ओळखू लागले आहेत. आम्ही जर का बंड केले नसते, तर महाराष्ट्राच्या जनतेने सुषमा अंधारे यांना ओळखले देखील नसते.

यावेळी किशोर पाटील यांनी आपल्याला मंत्रीपदाची देखील अपेक्षा आहे, असे म्हंटले आहे.
जनतेचे आशीर्वाद असतील, तर मला संधी मिळेल, त्यामुळे मी मंत्रीपदाची देखील अपेक्षा ठेवतो,
असे पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यात भावी मंत्री या आशयाचे किशोर पाटील यांचे बॅनर देखील लागले आहेत.
पाचोरा या ठिकाणी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते.

Web Title :-  Sushma Andhare | jalgaon mla kishor patil slams shivsena sushma andhare over politics news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना सोमय्यांचे चॅलेंज, म्हणाले – ‘संजय अंधारीला…’

Diabetes Reverse | दीर्घकाळ मधुमेहाने पीडित आहात का? कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 6 वनस्पतींचा आहारात करा समावेश