Pune Crime | पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस हवालदाराला अटक; आम्लेट नीट बनवता येत नाही का म्हणत डोक्यात घातली इलेक्ट्रीक पक्कड

पुणे : Pune Crime | आम्लेट नीट बनविता येत नाही का म्हणून पोलीस हवालदाराने (Pune Police Constable) आपल्या पत्नीच्या डोक्यात इलेक्ट्रीकची पक्कड मारुन, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) या हवालदाराला अटक केली आहे. (Pune Crime)

मनिष मदनसिंग गौड Manish Madan Singh Goud (वय ५०, रा. दत्तविहार सोसायटी, आंबेगाव) असे या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी आशा गौड Asha Goud (वय ४२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६९५/२२) दिली आहे. ही घटना आंबेगावमधील दत्तविहार सोसायटीत बुधवारी सायंकाळी सात वाजता घडली. (Pune Crime)

Advt.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष गौड यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात (Police Headquarters) आहे. ते सायंकाळी घरी असताना पत्नीने त्यांना आम्लेट बनवून दिले.
त्यावर त्यांनी आम्लेट नीट बनवून देता येत नाही का असे मोठ्याने ओरडून वाईट वाईट शिवीगाळ करुन ते तिच्या
अंगावर धावून गेले व हाताने मारहाण (Beating) केली.
फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रीक पक्कड उचलून फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी केले.
त्यानंतर दोन्ही हाताने फिर्यादीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीचा मुलगा आईला सोडविण्यास आला असताना त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची
धमकी दिली.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून गौड याला अटक (Arrest) केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक धामणे (Assistant Police Inspector Dhamane) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Police constable arrested for trying to kill wife; Electric tongs put on head saying why omelette can’t be made properly