Pune Crime | खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  खुनाचा प्रयत्नच्या गुन्ह्यात फरार (Abscond in Attempt to Murder Case) असणाऱ्या एकाला पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. संकेत शशिकांत कसबे (वय 20, रा. सर्वे नं. 36, संभाजी नगर, गणपती मंदिरा शेजारी, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. pune crime | pune crime branch police arrest criminal who abscond in attempt to murder case

शहरात वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबत पाहिजे असलेली आरोपी (वॉन्टेड), सराईत गुन्हेगार,
मोक्का तसेच फसवणूक करून पळालेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवत त्यांना जेरबंद केले जात आहे.
या दरम्यान खंडणी विरोधी पथक गस्त घालत असताना त्यांना सहकारनगर पोलीस (Sahakarnagar Police) ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करून पसार झालेला व या गुन्ह्यातील पाहिजे
आरोपी हा जांबुळवाडी दरी पुल येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून पकडले. चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याला पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या (sahakar nagar) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख (assistant commissioner of police surendra deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पाटील,
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस हवालदार संजय भापकर, पोलीस नाईक नितीन कांबळे,
राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण यांनी केली आहे.

Web Title : pune crime | pune crime branch police arrest criminal who abscond in attempt to murder case

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Woman Care | गरोदरपणात डाळिंब खाणे फायदेशीर आहे का?, जाणून घ्या

Builder Sanjay Gaikwad | कल्याण येथील प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड यांच्याविरोधात वीज चोरीप्रकरणी FIR

Atal Pension Yojana | केवळ 7 रुपये प्रतिदिवस गुंतवणुकीने दर महिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, फक्त करा ‘हे’ काम