Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुुळशीतून अटक

पुणे : Pune Crime : शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्या व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुंड रुपेश मारणे (Gangster Rupesh Marne) याला साथीदारासह मुळशीतून (Mulshi) अटक करण्यात आली. (Pune Crime)

रुपेश मारणे आणि संतोष शेलार (Santosh Shelar) अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Pune Crime)

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे (Gangster Gajanan Marne) याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का कारवाई (MCOCA Action On Gajanan Marne Gang) केली. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर सातारा येथून गज्या मारणे याला पोलिसांनी अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.

त्यानंतर रुपेश मारणे याने आणखी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता.
एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते.
त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते.
याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

या दोन्ही गुन्ह्यात पोलीस रुपेश मारणे याचा शोध घेत होते.
मुळशी परिसरात तो असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून रुपेश व संतोष शेलार दोघांना पकडले.

Web Title :- Pune Crime : Pune Police Crime Branch Arrest Gangster Rupesh Marne And Santosh Shelar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepika Padukone | आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिकाने शेअर केली ‘ती’ पोस्ट, सगळीकडे होत आहे चर्चा

Radhakrishna Vikhe-Patil | बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- राधाकृष्ण विखे- पाटील