Pune Crime | सोन्याच्या चीपचा मोह पडला महागात; सोन्याच्या चीपसाठी मंगळसुत्र केले चोरट्यांच्या हवाली

पुणे : Pune Crime | महिलांना सोन्याचा मोह असतो. सोन्याचे दागिने (Gold Jewelry), बिस्कीटे स्वस्तात देतो, असे कोणी म्हटल्यावर त्या हुरळुन जातात. असाच मोह एका ज्येष्ठ नागरिक महिलेला चांगलाच महागात पडला. त्यांनी सोन्याच्या चीपच्या मोहाने चक्क स्वत:च्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांच्या हवाली केले. (Pune Crime)

याप्रकरणी कात्रज येथे राहणार्‍या एका ६६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५८५/२२) दिली आहे. हा प्रकार कात्रज चौकातील बसस्टॉपवर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी जाण्यासाठी कात्रज चौकातील गोकुळनगर बाजूला जाणार्‍या बसस्टॉपवर आल्या होत्या.
यावेळी तिघा जणांनी त्यांच्याशी गोड बोलून विश्वास संपादन केला.
त्यांना आपल्याकडे सोन्याची चीप असल्याचे सांगितले. सोन्याची चीपच्या बदल्यात त्यांनी ६० हजार रुपयांचे २० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र दिले. प्रत्यक्षात ही सोन्याची चीप बनावट असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले.
पोलीस हवालदार महांगरे (Police Constable Mahanagare) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The temptation of gold chips is expensive; Mangalsutra handed over to thieves for gold chips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीवर कारवाई; पबवर छापा टाकून गुन्हे शाखेची कारवाई

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन