Pune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या केमिकल पावडरची चोरी

दौंड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime News | दौड तालुक्यातील कुरकुंभ (Kurkumbh) येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Modepro India Pvt. Ltd.) या कंपनीत तब्बल 75 लाख रक्कमेचा ब्रिंझ-7 नावाच्या 75 किलो केमिकल पावडरची चोरी (Theft of chemical powder) झाल्याची गंभीर स्वरूपाची घटना (Pune Crime) समोर आली आहे. याबाबत अशी तक्रार करण्यात आलीय. यात दौड तालुक्यातील मळद येथील रहिवासी सुनील ज्ञानदेव भंडलकर या कामगारावर संशयित म्हणून आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार 22 ते 29 जुलै दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आहे

याबाबत अधिक माहिती अशी, या अगोदर देखील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात रासायनिक
कच्चा मालाच्या, टँकर मधील केमिकल, भंगार अशा अनेक चोरीच्या घटना घडल्याचा प्रकार झाला आहे.
दरम्यान, अशा प्रकारे केमिकल पावडर चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या दरम्यान, केमिकल खरेदी विक्री च्या प्रकरणात एका कामगारा सहीत इतर या पावडरची
उपयोगिता जाणणाऱ्या आणखी कुणाचा सहभाग होता. याची तपासणी करणे आवश्यक असणार आहे.
म्हणून अशा माध्यमातून अवैध केमिकलचा वापर करणाऱ्या कंपनी चालकांचा किंवा
टोळीचा समावेश असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते.

या दरम्यान, यासंदर्भात मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिकारी उमाजी रेडकर (Umaji Redkar) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीवरून पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे (Police Constable Shrirang Shinde) हे पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे कुरकुंभ येथे विविध कंपनीत असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेच्या पद्धती व कंपनीच्या अंतर्गत काम करणारे केमिकल ची माहिती असणारे जाणकार यांची देखील भूमिका तपासली जाणार का याबाबत चर्चा सुरु आहे.

 

Web Title : Pune Crime | theft chemical powder worth rs 75 lakh incidents kurkumbh industrial area daund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Bihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच सोडली पतीची साथ, आता साकार करणार स्वप्न

Amarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याचा राजीनामा