Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : Pune Crime | किराणा दुकानासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapith Police) पतीसह तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत ओमप्रकाश दशरथ शाहु Omprakash Dashrath Shahu (वय ५५, रा. सप्तगिरीनगर, नागपूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती सुमित संजय मेढवाल Sumit Sanjay Medhwal (वय २४), सासु वंदना संजय मेढवाल Vandana Sanjay Medhwal (वय ४५, रा. समृद्धी रेसिडेन्सी, आंबेगाव पठार) आणि नणंद कोमल विक्रम बारीया Komal Vikram Baria (रा. मोहम्मदवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणा सुमित मेढवाल (Taruna Sumit Medhwal) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. छळाचा हा प्रकार आंबेगाव पठार येथील घरी १० एप्रिल ते २२ सप्टेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तरुणा हिचा सुमित याच्याबरोबर १० एप्रिल २०२२ रोजी विवाह झाला होता.
लग्नानंतर सुमित हा विनाकरण शिवीगाळ करुन तरुणाला मारहाण (Beating) करीत असे.
किराणा दुकान सुरु करण्यासाठी वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, या कारणसाठी तिला त्रास दिला जात होता.
या छळाला कंटाळून तिने २२ सप्टेबर रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे (Sub-Inspector of Police Shinde) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Tired of torture by in-laws, married woman commits suicide by hanging herself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पेट्रोलची नशा? 5 अल्पवयीन मुलांकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड परिसरातील घटना

Bug In Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या धोकादायक बग बाबत CERT ने जारी केला अलर्ट, डाटा लीक होण्याचा धोका