Pune Darshana Pawar Murder | हत्या झालेल्या दर्शना पवारचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Darshana Pawar Murder | ‘प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते…’ हे शेवटचे शब्द आहेत, राज्याला हादरुन टाकणाऱ्या खून प्रकरणातील दर्शना पवार (Darshana Pawar) हिचे. सामान्य कुटुंबातील दर्शना पवार (Darshana Pawar) हिने जिद्दीच्या जोरावर एमपीएससी परिक्षेत यश संपादन करुन राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. काही दिवसात ती वन विभागाची अधिकारी म्हणून रुजू होणार होती. पण रिजल्ट नंतर काहीच दिवसांत तिचा खून करण्यात आला. तिचा मृतदेह सहा दिवसांनंतर राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला. यावेळी दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्यावर अनेक जखमा आढळल्या असून या जखमा तिच्या हत्येची गंभीरता दाखवत होत्या. तिची हत्या आणि हे प्रकरण राज्यभरात तापले आहे. व यामुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता दर्शनाचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती भाषण देत आहे. दुर्दैवाने हे तिचे शेवटचे भाषण ठरले आहे. (Pune Darshana Pawar Murder)

एमपीएससी (MPSC) सारख्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या दर्शना पवारचा हा व्हिडीओ समोर आला आहे. रिजल्टनंतर पुण्यातील स्पॉटलाईट अ‍ॅकॅडमीमध्ये (Spotlight Academy, Pune) तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी दर्शनाने जे भाषण दिले होते त्याचा व्हिडीओ आली आहे. या व्हिडीओतील तिच्या भाषणातून तिची स्वप्ने, आशा, आकांशा दिसून येत आहेत. तिचा हा व्हिडीओ मनाला चटका लावणारा आहे. (Darshana Pawar Video)

दर्शना पवार तिच्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येते. आपण स्कूल, कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलताय, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. विचारतात की सांग कसा अभ्यास केला पाहिजे. ती गोष्टी साध्य केलेली असते ना, त्यात खूप लोकांचा हात असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते”, असं दर्शना पवारने आपल्या शेवटच्या भाषणात म्हटलं आहे. (MPSC Student Murder Case)

दर्शना पवार (Darshana Pawar) ही दुर्घटना अत्यंत हृद्यदावक असून यावरुन गृहखात्यावर ताशेरे ओढले जात आहे.
एका भावी अधिकाऱ्याची रायगडाखाली हत्या होते आणि मृतदेह सहा दिवसांनंतर सापडतो ही अत्यंत धक्कादायक
बाब आहे. दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी होती. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या दर्शनाने अथक प्रयत्नांती एमपीएसी परीक्षेत टॉप केले होते. अनेकांनी तिचे कौतुक केले होते. मात्र, 12 जून रोजी दर्शना तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत राजगड किल्ल्याच्या परिसरात दुचाकीवरुन फिरण्यासाठी गेली. (Rajgad Murder Case) सकाळी सुमारे 10 च्या सुमारास राहुल हांडोरे (Rahul Handore) किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याची माहिती समोर आली. ही घटना झाल्यापासून राहुल हांडोरे हा गायब आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (Darshana Pawar Murder Case)

Web Title : Pune Darshana Pawar Murder | darshana pawar murder case and spotlight academy last speech viral video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा