Pune Dhankawadi Crime | क्लासमध्ये घसून महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Dhankawadi Crime | प्रेम संबंधाबाबत (Love Affair) घरी का सांगता असे म्हणत महिलेच्या पतीला चार जणांनी क्लासमध्ये येऊन अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी महिलेने मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.28) सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान धनकवडी येथील एका क्लासमध्ये घडला आहे. याप्रकरणी एका तरुणीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Dhankawadi Crime)

याबाबत 50 वर्षीय महिला शिक्षिकेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुरुवारी (दि.29) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन दिव्यानी गणेश तुम्मा, साई भुजबळ व इतर दोन मुलांवर आयपीसी 452, 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी ऐकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी यांचे पती धनकवडी
येथे त्यांच्या राहत्या घरात ट्यूशन क्लासेस घेतात. बुधवारी सायंकाळी आरोपी त्याठिकाणी आले.
आरोपींनी फिर्य़ादी यांच्या पतीला ‘आमच्या प्रेमाबद्दल घरी का सांगता?’ असे म्हणत अश्लील शिवागाळ करुन हाताने
मारहाण केली. त्यावेळी फिर्याद भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांना अश्लील बोलून,
केस ओढून गैरवर्तन करुन विनयभंग केला. तसेच हाताने मारहाण केली.

दरम्यान, हा प्रकार सुरु असताना क्लासमधील मुलांनी आरडाओरडा केला. ‘तुम्हाला इथुन वाटेला लावु, हकलुन देवु,
क्लास बंद पाडु, तुम्ही हे प्रकरण वाढवले तर तुमचे हातपाय मोडु, आम्ही 16 नंबरचे आहोत, तुम्हाला खोट्या केसमध्ये
अडकवू’ अशी धमकी देऊन आरोपी क्लासमधून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sinhagad Road News | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त

पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून पिस्टलसह अटक

Pune Crime Branch News | घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक; 3 गुन्हे उघडकीस, 5 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Video)