Pune : ‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या राज्य सरकारच्या परवानग्या न घेता शिक्रापूर येथे कोविड केअर सेंटर सुरू केल्याप्रकरणी एका डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी हा आदेश दिला. संबंधित रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्रापुरमध्ये खळबळ उडाली होती.

निखिल विजय इंगळे (रा. शिक्रापूर) असे या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंगळे सह चौंघावर गुन्हा दाखल केला आहे. बंडगर, विजय डोईफोडे, डॉ. घाटे अशी इतर आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शिक्रापूर येथे आधार नावा कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. पण मुळात रुग्णालय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य ती प्रमाणपत्रे नाहीत. असे असताना तेथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. या रुग्णालयात उपचार घेताना दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूपत्रावर चारही आरोपींच्या नावाने सीन बाय असा उल्लेख होता. मात्र त्यांनी अशा प्रकारचे रुग्णालय सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी घेतली नाही, अशी फिर्याद देण्यात आली आहे. इंगळे याच्या जामीन अर्जास सरकारी वकील निवेदिता काळे यांनी विरोध केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने इंगळे याचा जामीन फेटाळला.