Pune Drug Case-Drug Mafia Lalit Patil | ड्रग्जप्रकरणात राजकीय नेत्यांचा रंगला ‘फोटो-फोटो’चा खेळ, आता आव्हाडांनी CM शिंदेंचा ‘तो’ फोटो दाखवला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Drug Case-Drug Mafia Lalit Patil | राज्यातील ड्रग्ज प्रकरणात रोजच्या रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी ड्रग्ज सापडत आहे. ललित पाटील ड्रग्जप्रकरणात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नावे घेतली जात आहेत. अशा गंभीर स्थितीत सत्ताधारी पक्ष जबाबदारी न घेता, उलट विरोधकांवर आरोप करून प्रकरणांचे गांभिर्य नसल्याचे दाखवून देत आहे. सुरूवातीलाच सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात फोटोचा खेळ सुरू केला. तो अजून सुरू आहे. आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दाखवलेल्या फोटोला आव्हाडांनी सीएम शिंदेंचा (CM Eknath Shinde) फोटो दाखवून उत्तर दिले आहे. (Pune Drug Case-Drug Mafia Lalit Patil)

ड्रग्जप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेंनी जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) गंभीर आरोप करताना मुंब्रा येथील ड्रग्जमाफिया सलमान फाळके सोबतचा फोटो दाखवला आणि खुलासा करण्याचे आव्हान आव्हाडांना दिले होते. (Pune Drug Case-Drug Mafia Lalit Patil)

यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका गुन्हेगारासोबतचा फोटो दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कायंदे यांना खुलासा करण्याचे आव्हान दिले आहे. आव्हाड यांनी म्हटले की, येता-जाता अनेकजण आमच्यासोबत फोटो काढतात, फोटो काढताना कुणी कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवत नाही. कुणी फोटो काढला तर ती आमची चूक नाही.

माझ्याकडेही एक फोटो आहे. हा गुन्हेगार किती गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे ही माहिती मनिषा कायंदे यांनी घ्यावी. असे फोटो दाखवायला लागलो तर फोटोंचा अल्बम तयार होईल. जो प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर द्या, ड्रग्ज कुठून येत आहे? कारण नसताना मुद्दे भरकटवण्यासाठी काहीही आरोप करायचे नाही.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, चालता चालता उभे असताना मुले फोटो काढतात, त्याला मी काय करू? फोटो काढणे बंद करू का? फोटोमधील नाव अतिशय परिचयाचे आहे. हा इन्स्टाग्राम, युट्यूबमधील हिरो आहे. याची दहशत पूर्ण ठाणे जिल्ह्यात आहे. माझ्यासोबतचा कार्यकर्ता असेल त्याने उद्या रागात जाऊन २ मर्डर केले. त्यात माझा काय दोष? असे अनेक प्रकार चालतात.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने साताऱ्यात फायरिंग केले, ३ जणांना मारले. कारण नसताना बोट दाखवण्याचा प्रयत्न करू नका. सुप्रियाताईंनी कुणाचे नाव घेतले नव्हते. एवढे मनाला लावू घेऊन नका. ड्रग्ज घेणे चुकीचे आहे हे महाराष्ट्रात बोलणे चुकीचे असेल तर बोलायलाच नको.

आव्हाड म्हणाले, मी आताही कुणाचे नाव घेतले नाही.
फोटोवरून आरोप करणार असाल तर ठाण्यातील नगरसेवकांचे कुणाकुणाशी संबंध आहेत ते सगळ्या पोलिसांना
माहिती आहे. विरोधी पक्षात आहे बोलणार. मंत्री सत्तेत असतात, पोलीस त्यांचे ऐकतात म्हणून विरोधी पक्ष आरोप करतात.
ठाण्यातील पोलीस हवालदारही आमचे ऐकत नाही. पोलीस निष्क्रिय आहेत. ड्रग्जमुळे एक पिढी बरबाद होणार आहे.
माझ्या बाजूला फोटो काढणारा असेल त्याचा धंदा काय हे विचारत बसू. मी हा फोटो दाखवला त्याचे बॅकग्राऊंड मनिषा कायंदेंनी शोधावे.

आव्हाड म्हणाले, ड्रग्ज प्रकरणी जे आरोपी असतील त्यांना जेलमध्ये टाका की परत बाहेर यायला नको.
ललित पाटीलने मी नावे सांगेन असे म्हटले. पोलीस कोठडीत त्याचा जबाब नोंदवतील. काही नावे पुढे येणार नाहीत.
हे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार नाही. आरोप झाल्यावर राजीनामे द्या. हे वॉशिंग मशिनचे सरकार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baba Maharaj Satarkar Passed Away | ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

Kashish Social Foundation | सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या लष्करी जवान राजाराम वाणी यांचा होणार विशेष सन्मान