Pune Durg Case | पुणे पोलिसांकडून ड्रग्ज तस्करांना दणका! 5 नायजेरियन नागरिकांसह 7 जणांना अटक; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Durg Case | पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) झिरो टोलरंन्स टु ड्रग या मोहिमेअंतर्गत कारवाई करुन 5 गुन्हे दाखल करुन 5 नायजेरियन नागरिकांसह 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 35 लाख रुपये किमतीचे 171 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी ड्रग्ज फ्रि पुणे (Drug Free Pune) हे अभियान राबवले आहे. या अनुषंगाने पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील अभिलेखावरील अंमली पदार्थ गुन्ह्यातील आरोपींचे चेकींग मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुन्हे शाखेने बुधवारी (दि.20) 15 पथके तयार करुन हडपसर आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, मांजरी, वानवडी, कोंढवा या हद्दीत पेट्रोलींग करुन आरोपींची चेकींग करण्यात आली.

पोलिसांच्या पथकांनी रेकॉर्डवरील आरोपी तसेच पेडलर यांना चेक केले. या कारवाईत पाच आरोपींच्या घरांची झडती घेतली असता त्यांच्या घरात अंमली पदार्थ मिळाला. पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केला आहे. यामध्ये आयोडोफो फेबिन येनेडयु (रा. जगदंबा भवन रोड, पिसोळी) याच्याकडे 24 ग्रॅम एम.डी, ओला माईड क्रिस्टोफर कायोदे (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्याकडे 30 ग्रॅम एम.डी, कोहिंदे सोदीक इद्रीस (रा. गोपाळपट्टी, मांजरी) याच्याकडे 34 ग्रॅम एमडी, जाहीटी ट्राबी सेव्हेरीन, इमॅन्युअल नवातु (रा. बांदल वस्ती, उंड्री वडाचीवाडी रोड) यांच्याकडून 26 ग्रॅम एम.डी असा एकूण 22 लाख रुपये किंमतीचे 114 ग्रॅम एमडी जप्त केले. तसेच आरोपींकडून एक लाख रुपये किंमतीची तीन दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींच्या घराच्या झडती दरम्यान अनधिकृतपणे राहणाऱ्या 11 परदेशी नागरिवरांवर कारवाई केली जात आहे.

अटक केलेल्या आरोपींपैकी आयडोफो येनेडयु, ओलामाईड कायोदे, कोहिंदे इद्रीस हे तीन आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर जाहीटी सेव्हेरीन व इमॅन्युअल नवातु हे ड्रग पेडलरचे काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींवर हडपसर आणि कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच कोथरुड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पेट्रोलींग दरम्यान कारवाई करुन 12 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला
असून दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुणश्री सोसायटी जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात करण्यात आली.
या कारवाईत ईर्शाद समशेर खान (वय-31 रा. नयानगर, मीरा रोड, जि.ठाणे), ईक्बाल समशेर खान (वय-37 ईम्नीस्टी
बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि. ठाणे) यांना ताब्यात घेऊन 12 लाखांचे एमडी जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, गुन्हे शाखेचे 7 पोलीस निरीक्षक 15 सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक,
125 अंमलदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या महागड्या वस्तू लंपास, चालकावर FIR

MIDC Bhosari Accident | पिंपरी : पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, बस चालकावर FIR