Pune Fire Brigade News | पुणे अग्निशामक दलातील दोघांना ‘गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire Brigade News | पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दला कडील (Pune Fire Brigade News) फायर इंजिन ड्रायव्हर करीमखान फैजलखान पठाण (Fire Engine Driver Karimkhan Faizalkhan Pathan) आणि अॅम्ब्युलन्स अटेंडंट नरसिह बसप्पा पटेल (Ambulance Attendant Narsih Basappa Patel) यांना ‘गुणोत्कृष्ट आग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी Independence Day (15 ऑगस्ट) पठाण आणि पटेल यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

करीमखान पठाण हे 1988 मध्ये अॅम्ब्यूलन्स अटेन्डट म्हणून पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade News) सेवेत दाखल झाले. त्यानंतर त्यांची 1997 मध्ये फायर इंजिन चालक या पदावर बढती झाली. 36 वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवा काळात त्यांनी 2016 मध्ये रविवार पेठ, भोरीआळी येथील दुकानांना लागलेल्या आगीत अडकलेल्या लोकांची सुटका केली. तसेच सप्टेंबर 2019 मध्ये पुणे स्टेशन (Pune Station) येथील क्रॉसवर्ड बुक शॉप (Crossword Book Shop) येथे लागलेल्या भीषण आगीत उत्कृष्ट काम करुन अनेकांची सुटका केली. तर ऑक्टोबर 2018 मध्ये मंगळवार पेठ, गाडीतळ, गणेश पेठ, पाटील इस्टेट झोपडपट्टी आणि ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) येथे लागलेल्या आगीच्या वेळी त्यांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन मोठी जिवीत हानी टाळली होती.

नरसिंह पटेल हे 1998 मध्ये अॅम्ब्यूलन्स अटेनडंट म्हणून पुणे मनपाच्या अग्निशमन दलात (PMC Fire Brigade)
रुजू झाले. त्यांनी रुग्णवाहिकेवर काम करत असताना अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करुन, तसेच विविध आग, अपघात आणि आपत्तीच्या वेळी जखमी नागरिकांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या धडसी कामगिरीची दखल घेऊन मनपाच्या वतीने त्यांना वेळोवेळी रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.

पटेल यांनी आपल्या 25 वर्षाच्या सेवेत 2003 मध्ये फिल्म इंस्टीट्यूट (Film Institute) लॉ कॉलेज रोड, काशेवाडी झोपडपट्टी,
मंगळवार पेठ येथील पेट्रोल पंप येथे लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या लोकांची सुटका केली.
तळजाईपठार, धनकवडी येथे 2012 मध्ये कोसळलेल्या इमारतीच्या वेळी अग्निशमन दलाच्या बचाव पथकासोबत
उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच कात्रज व धनकवडी येथे झालेल्या मोठ्या पावसाच्या वेळी पाण्यात अडलेल्या अनेक
लोकांची सुटका केली.

‘गुणोत्कृष्ट आग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल करीमखान पठाण व नरसिंह पटेल यांना अग्निश्मन दलाचे
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे आणि इतर अधिकारी वर्ग व जवांनांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Innovative Healthcare Solutions at Railway Stations: Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Kendras (PMBJKs) on the Horizon

PMPML Services Set to Join ‘One Pune Card’ for Seamless Commuting

Police Mitra Sanghatna | शंभर पोलिस चौक्या अद्ययावत होणार – चंद्रकांत पाटील