Pune | राज्यभरात प्रसिद्ध असलेली गुळुंचेची ‘काटेबारस’ यात्रा ‘हरहर महादेव’च्या जयघोषात साजरी

नीरा (मोहंम्मदगौस आतार) – Pune | राज्य भरासह देशात प्रसिद्ध असलेली पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारस यात्रा उत्साही वातावरणात , ‘हर हर महादेव’ च्या गजरात, ढोल – ताशांच्या निनादात , गुलालाने चिंब झालेल्या भक्तांच्या हजेरीत संपन्न झाली.गेली बारा दिवस चाललेली काटेबारस याञेची सांंगता सोमवारी (दि.१५) ‘ काटेमोडवनाने’ झाली. यावेळी हजारो भाविकांसह महिला व शिवभक्त उपस्थित (Pune) होते.

याञा काळात ज्योतिर्लिंग मंदिराला फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे गुळूंचे येथील प्रसिद्ध काटेबारस यात्रा साधेपणाने व मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली होती. यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने कोरोना नियमांचे निर्बंध शिथील केले आहेत. तसेेच मंदीरे ही उघडण्यास परवानगी दिलीआहे. त्यामुळे सोमवारी (दि.१५) भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असलेली गुळूंचे येथील प्रसिद्ध काटेबारस याञा उत्साहात (Pune) झाली.

शुक्रवार ( दि.५ )(कार्तिक प्रतिपदा) दिपावली पाडव्या दिवशी ज्योतिर्लिंग मंदिरात घटस्थापना करून यात्रेस सुरुवात झाली. यंदा तिथीचा क्षय आल्याने सप्तमी व अष्टमी एकाच दिवशी आल्याने कार्तिक शुद्ध द्वादशीस सोमवारी ( दि.१५) ‘ काटेबारस’ साजरी करण्यात आली.

गुळूंचे येथील ज्योतिर्लिंगाचे भक्त बाभळीच्या काट्याच्या ढिगांवर उघड्या अंगाने पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे उड्या घेतात, हे या यात्रेतील प्रमुख वैशिष्टय तसेच आकर्षण मानले जाते. त्यामुळे ज्योतिर्लिंगाची ही यात्रा’ काटेबारस’ यात्रा म्हणून राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. बारा दिवस नियमितपणे छबिना , काकडारती , कीर्तन – भजन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुळूंचे गावातील असंख्य ग्रामस्थ व महिला भक्तांनी बारा दिवस उपवास केला.तसेच गेली बारा दिवस गावातील भक्तांनी सुमारे ३०० नवसाच्या समया दिवस रात्र अखंडपणे तेवत ठेवल्या होत्या.

दरम्यान ,सोमवारी (दि.१५) रोजी पहाटे पासून असंख्य भाविकांनी देवाला ओल्या अंगाने दंडवत घालण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास देवाच्या पालखीने बहिणीच्या भेटीसाठी टाळ- मृदंगाच्या व ढोल ताशाच्या गजरात ज्योतिर्लिंग मंदिरापासून प्रस्थान केले. त्यानंतर पालखीच्या भव्य सोहळ्याने लवाजम्यासह काठीला प्रदक्षिणा घालून आरती केली. मंदिरासमोरील प्रांगणात भाविकांनी काटेरी बाभळीच्या काट्यांचा मोठ्या प्रमाणात ढीग रचला. सुमारे अर्धा तासाच्या कालावधीनंतर मंदिरासमोरील पटांगणामध्ये रचलेल्या काट्यांच्या ढिगा-यास पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी मंदिरात नेण्यात आली. रचलेल्या काट्यांच्या ढिगा-यांभोवती हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर महिलावर्गाने परिसरातील इमारतीच्या व मंदिराच्या आवारात गर्दी केली होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रचलेल्या काट्यांच्या ढिगा-यांत ‘हर हर भोले, हर हर महादेव’ ‘ज्योतिर्लिंग महाराज की जय ‘असा जयघोष करीत एकामागून एक भक्त अशा जवळपास शेकडो भक्तांनी उघड्या अंगाने उड्या (Pune) घेतल्या.
लहान मुलांसह व उच्च शिक्षित तरूण वर्गही मोठ्या भक्तीभावाने बारा दिवस उपवास धरतात .

उघड्या अंगाने काट्यात उड्या घेण्याचे खरोखरच अंगावर काटे आणणारे हे रोमांचकारी दृश्य पाहून महिलावर्ग , तसेच उपस्थित भाविक आश्चर्यचकित होत होते.
बाभळीच्या काट्यांमध्ये उड्या घेणे हे ‘ काटेबारस’ यात्रेतील महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.
हा दिवस काटेबारस यात्रेतील मुख्य दिवस असून यात्रेची सांगता काटेमोडवनाने झाली.
गुळुंचे येथे साज-या झालेल्या आगळ्यावेगळ्या काटेबारस यात्रेकरिता हजारो भाविकांनी ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारी दोन वाजता काटेबारस यात्रेची सांगता झाली.

यावेळी पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, युवक काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप ,
नीरा ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, सोमेश्वरचे संचालक जितेंद्र निगडे, कांचन निगडे, माजी उपसरपंच संतोष निगडे,
सुधीर निगडे, नितीन निगडे, गोरखभाऊ निगडे, पोपट निगडे , यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी , मानकरी,ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

यावेळी जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कैलास गोतपागर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune | Guluche’s ‘Katebaras’ Yatra celebrated all over the state in celebration of ‘Harhar Mahadev’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update