Pune Hadapsar News | पुणे: हडपसर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Hadapsar News | लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election 2024) आदर्श आचारंसहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हडपसर येथील साधना विद्यालय (Sadhana Vidyalaya Hadapsar) येथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी यांच्या हडपसर येथे आयोजित बैठकीत करण्यात आले.(Pune Hadapsar News)

बैठकीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे (Swapnil More), अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी नागनाथ भोसले (Nagnath Bhosale) यांनी नेमण्यात आलेले भरारी पथक, मतदान केंद्र आणि सहाय्यकारी मतदान केंद्राबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.

निवडणूक शांततेत, निर्भयपणे आणि मुक्त वातावरणात पार पडावी आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रीया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. त्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख आणि गणेश इंगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”

Baramati Lok Sabha Election 2024 | स्थलांतरीत कामगारांच्या मतदानासाठी कृतीयोजना तयार करा; बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर, रंगली ‘चाय पे चर्चा’, शहराच्या विकासावर मांडले मत (Video)