Pune ISIS Case | पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या ISIS च्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कामगिरी; NIA ने जाहीर केले होते बक्षीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pune ISIS Case | दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) आयएसआयएस मॉड्यूलच्या (ISIS Module Case) मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तीन जणांना अटक केली आहे. मोहम्मद शाहनवाज उर्फ शफी उज्जामा असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शाहनवाजची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी काही जणांना ताब्यात घेतले. शाहनवाज याच्यावर नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने National Investigation Agency (NIA) तीन लाखांचे बक्षीस ठेवले होते. शाहनवाज आणि इतर एका व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर तिसऱ्या संशयिताला दिल्लीबाहेरून अटक केली आहे. शाहनवाज हा पुण्यातून फरार झाला होता. (Pune ISIS Case)

पुणे आयएसआयएस मोड्युल प्रकरणी शाहनवाज (Shahnawaz alias Shafi Uzzama) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. शाहनवाज हा पुण्यात वास्तव्याला होता. 18 जुलै रोजी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांसोबत शाहनवाज हा देखील होता. परंतु पुणे पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात असताना त्याने पळ काडला होता. मात्र आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या तिनही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune ISIS Case)

दिल्ली आणि पुणे पोलिसांचे दिल्लीत छापे

दिल्लीत वास्तव्यास राहून शाहनवाज ISIS च्या स्लीपर सेलसाठी लोकांची भरती करण्याचा प्रयत्न करत होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून शाहनवाजच्या चौकशीच्या आधारे या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
दिल्लीत शहनावाज, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख हे तीन इसिस दहशतवादी लपल्याची
गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनआयए आणि पुणे पोलिसांनी दोन दिवस मध्य दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले होते.
देशातील इतर यंत्रणाही दिल्ली-एनसीआरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होत्या.
अखेर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

NIA कडून प्रत्येकी 3 लाखांचे बक्षीस

एनआयए ने गेल्या महिन्यात ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात फरार आरोपी शाहनवाज विरोधात रोख बक्षीस जाहीर केले होते.
मोहम्मद शहनवाज, शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला
आणि ताला लिवाकत खान या चार आरोपींची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा
करण्यात आली होती. तसेच आरोपीची माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख गुप्त ठेवली जाणार असल्याची हमी एनआयए
ने दिली होती.

https://x.com/ANI/status/1708743408939110758?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | पीएमपीची कॅशलेश तिकीट सुविधा, लवकरच एकाच तिकीटात पीएमपी अन् मेट्रो प्रवास; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच