Chandrakant Patil | पीएमपीची कॅशलेश तिकीट सुविधा, लवकरच एकाच तिकीटात पीएमपी अन् मेट्रो प्रवास; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीने कॅशलेश तिकीट (PMP Cashless Ticket) सेवा सुरु केली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते रविवारपासून या सेवेचा प्रारंभ झाला. युपीआय क्यू-आर कोड स्कॅन करुन प्रवाशांना तिकीट घेता येणार आहे. कॅशलेस सुविधा सुरु करण्यात आली असली तरी जुन्या तिकीट प्रणालीवर याचा काहीही परिणाम होणार नाही. कॅशलेस तिकीट सेवा सुरु झाल्याने सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद थांबणार आहेत. (Chandrakant Patil)

पीएमपीमध्ये कॅशलेश सुविधा सुरु केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, डिजिटल व्यवहार (Digital Transactions) वाढले पाहिजेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Nrendra Modi) यांची इच्छा आहे. जगात सगळ्यात जास्त डिजिटल व्यवहार आज भारतात होत आहेत. मात्र, पीएमपीएमएल या डिजिटल व्यवहारात मागे आहे. त्यामुळे पीएमपी आणि मेट्रो (Pune Metro) यांची तिकीट यंत्रणा एकत्र करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याची माहिती चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पीएमपीकडून
विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कॅशलेस तिकीट
सेवा सुरु करण्याची घोषणा पीएमपीचे अध्यक्ष डॉ. सचिन्द्र प्रताप सिंग (PMP President Dr. Sachindra Pratap Singh)
यांनी केली होती. या सेवेची बाणेर आगारात प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रविवार पासून पीएमपीच्या कार्यक्षेत्रात याच सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सचिन्द्र प्रताप सिंह, सहव्यस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार,
माजी नगरसेवक गणेश वरपे, नवनाथ जाधव, अजय मारणे, किरण दगडे-पाटील, अल्पना वरपे, दिलीप वेडे-पाटील,
संदीप बुटाला उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | वाकड: येथे दारु पिऊ नका म्हटल्याने व्यावसायिकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न