Pune Kasba Chinchwad Bypoll Election | संभाजी ब्रिगेडच्या निर्णयामुळे मविआचा मार्ग सुकर?, शिवसेनेच्या मध्यस्थीला आलं यश; भाजपचं टेन्शन वाढणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Chinchwad Bypoll Election | पण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीवरुन (Pune By Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून चिंचवड आणि कसब्यात (Pune Kasba Peth Bypoll Election) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान महाविकास आघाडीसाठी (For Mahavikas Aghadi) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena Thackeray Group) मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) चिंचवड (Chinchwad Bypoll Election) आणि कसब्यातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. (Pune Kasba Chinchwad Bypoll Election)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार सचिन अहीर (MLA Sachin Ahir) यांच्या शिष्टाईनंतर संभाजी ब्रिगेडने दोन्ही ठिकाणचे अर्ज मागे घेण्यास होकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. कसब्यातून अविनाश मोहिते (Avinash Mohite) आणि चिंचवडमधून प्रवीण कदम (Praveen Kadam) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. दोन्ही उमेदवारांनी प्रचारही सुरू केला होता. संभाजी ब्रिगेडने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं होतं.

दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी चर्चा केली.
त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी दोन्ही उमेदवारांची भेट घेतली. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशी चर्चा केली. तसेच या नेत्यांची आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा घडवून आणली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने निवडणुककीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे मतांची विभागणी टळणार आहे.

भाजपकडून दवेंची मनधरणी

हिंदू मतांमध्ये फूट पडू नये यासाठी भाजने देखील हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी अर्ज
मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दवे यांनी उमेदवारी कायम ठेवली तर त्याचा फटका भाजपच्या
उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते देवे यांची मनधरणी करत आहेत.
भाजपच्या नेत्यांच्या प्रयत्नांना दवे कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.

Web Title :- Pune Kasba Chinchwad Bypoll Election | sambhaji brigade withdraws from pune by election kasba peth and chinchwad constituencies