Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

पुणे : Pune Kasba Peth Bypoll Election | निवडणुकीच्या रिंगणात विरोधी पक्षातील नाराजांना गळाला लावण्यात एक्स्पर्ट असलेल्या भाजपला काँग्रेसच्या नाराजाकडून चांगलाच झटका मिळाला. काँग्रेस चे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी पक्ष नेतृत्वाच्या आवाहनानंतर उमेदवारी तर मागे घेतलीच त्याचवेळी अगदी दारात पोहोचलेल्या भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांना मी 40 वर्षांपासून काँग्रेस मध्येच आहे आणि काँग्रेस मध्येच राहणार असे छातीठोक पणे सांगून त्यांना माघारी पाठवले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी दाभेकर प्रयत्नशील होते. परंतु पक्षाने रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या दाभेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे डोकेदुखी वाढल्याने काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte) यांनी पदाधिकाऱ्यांसोबत दाभेकर यांची भेट घेऊन विनंती केली. थोपटे यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade), श्रीकांत शिरोळे (Shrikant Shirole), शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे (Vishal Dhanwade) यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी दाभेकर यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ यावर दाभेकर ठाम होते. दाभेकर यांच्यासारखा पेठेतील पदाधिकारी गळाला लागेल यासाठी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) आणि गणेश बिडकर (Ganesh Bidkar) हे दाभेकर यांच्या कार्यालयात पोहोचले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

तत्पूर्वी संग्राम थोपटे यांनी दाभेकर यांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत मोबाईल
वर बोलणे घडवून आणले होते. पटोले यांच्याशी चर्चेनन्तर दाभेकर यांनी बिनशर्त माघार घेण्याचे जाहीर केले.
त्याचवेळी आपण 40 वर्षांपासून काँग्रेस मध्ये असून यापुढेही काँग्रेस मध्येच राहणार असे स्पष्ट केले.
दाभेकर यांच्या ठाम भूमिकेमुळे भाजपच्या मिसाळ आणि बिडकर यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Kasba by-election: Congress takes place and will remain in Congress! Dhangekar gains strength as Dabhekar withdraws candidacy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग