Pune Katraj Crime | पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण, कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Crime | पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला व त्याच्या आईला मेहुण्याने धारदार वस्तूने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.20) रात्री नऊच्या सुमारास कात्रज येथील संतोषी माता मंदिराजवळ (Santoshi Mata Mandir Katraj) असलेल्या वृंदावन कॉलनीत घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Katraj Crime)

याबाबत शंकर मुरुळी काटरावत (वय-24 रा. वृंदावन कॉलनी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आकाश कंजेरिया (वय-21 रा. संतोषनगर, कात्रज) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी तिच्या वडिलांच्या घरी गेली होती. तिला आणण्यासाठी फिर्य़ादी व त्यांची आई गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा मेहुणा याने फिर्यादी यांच्या पत्नीला तू जायचे नाहिस असे सांगितले. फिर्यादी यांनी पत्नीसोबत बोलायचे आहे असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपी आकाश याने फिर्यादी व त्यांच्या आईला हाताने मारहाण केली. तसेच हातातील धारदार वस्तुने फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दारुच्या नशेत महिलेच्या घरात घुसून मारहाण

लोहगाव (Lohegaon) : दारुच्या नशेत महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून सामानाची तोडफोड केली.
तसेच महिलेला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police)
दोन भावांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 14 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास लोहगाव येथे घडली.
याबाबत 37 वर्षाच्या महिलेने फिर्य़ाद दिली आहे. यावरुन संतोष हेमंत घोलप (वय-35) व प्रविण घोलप यांच्यावर
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश; आचारसंहिता भंग झाल्याचे आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत

Pune Hadapsar Crime | पुणे : डोळा मारून फ्लाईंग किस, जाब विचारताच महिलेच्या पतीला मारहाण