Pune Hadapsar Crime | पुणे : डोळा मारून फ्लाईंग किस, जाब विचारताच महिलेच्या पतीला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला डोळा मारून फ्लाईंग किस करुन हाताने इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली (Marhan). याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी (Laxmi Colony Hadapsar) येथे 13 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत 32 वर्षाच्या महिलेने बुधवारी (दि.20) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रशांत वणवे (वय-40 रा. हडपसर) व त्याच्या पत्नीवर आयपीसी 509, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच परिसरात राहतात. 13 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महिला रस्त्याने जात असताना आरोपी गल्लीमध्ये उभा होता. आरोपीने महिलेकडे पाहून डोळा मारला. तसेच फ्लाईंग किस करुन हातवारे केले. याबाबत महिलेने तिच्या पतीला सांगितले. महिला आणि तिचे पती याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी प्रशांत वणवे व त्याच्या पत्नीने फिर्य़ादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

वृद्ध महिलेची सव्वा लाखांची फसवणूक

पुणे : इलेक्ट्रीक मोटार सायकल देण्याच्या बहाण्याने एका 71 वर्षाच्या महिलेची एक लाख 38 हजार रुपयांची फसवणूक
(Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकावर लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station)
गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी 71 वर्षीय महिलेने सिंपल वन कंपनीची इलेक्ट्रीक मोटार सायकल बनावट वेबसाईटवर
बुक केली. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन ऑनलाईन पैसे घेतले. मात्र, दुचाकी न देता फसवणूक केली.
हा प्रकार ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत एम.जी. रोड कॅम्प पुणे येथे घडला आहे.
पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Police | वारजे माळवाडी पोलिसांकडून मोक्क्यातील दोन फरार आरोपींना अटक

Earthquake In Marathwada | हिंगोली, परभणी व नांदेडमध्ये भूकंप, रिश्टर स्केलवर 4.5 ची नोंद

Sharad Pawar Sister Saroj Patil On NCP Split | ‘निवडणुका संपल्या की सगळे…’, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या वक्तव्याने तर्क-वितर्कांना उधाण

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | राज ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री भेट, माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले…

Pune Hadapsar Crime | सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना